आठवणी १ | Aathavani 1

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Aathavani 1 by ज. स. करंदीकर - J. S. Karandeekarसदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat

More Information About Authors :

ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar

No Information available about ज. स. करंदीकर - J. S. Karandeekar

Add Infomation AboutJ. S. Karandeekar

सदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat

No Information available about सदाशिव विनायक बापट - Sadashiv Vinayak Bapat

Add Infomation AboutSadashiv Vinayak Bapat

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
(५) गुण असल्यास त्याच्या योगाने कुटुंब मोठ्या पदवीला चढते; म्हणून त्या कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीस पित्याविषयी अत्यंत आदर वाटतो, तथापि पित्याच्या प्रेमळपणाचा लाभ व्यक्तिशः प्रत्येक व्यक्तीस मिळतोच असें नाही. अर्थातच प्रत्येक व्यक्तीस त्या पित्याविषया प्रेम वाटेलच असे म्हणवत नाही. परंतु भातेची गोष्ट वेगळी आहे. तिच्या प्रेमळपणाच्या छायेचा लाभ कुटुंबांतील प्रत्येक व्यक्तीस होतो, त्यामुळे प्रत्येक व्यक्तीला मातेविषयी प्रेम वाटतेंच वाटते. मातेच्या अगच्या गुणांमुळे कुटुंबाच्या मोठेपणांत किती भर पडली याचा विचार कुटुंबांतील व्याक्ति करीत बसत नाहीत. लोकमान्य टिळक हे महाराष्ट्रालाच नव्हे तर अखिल भारताला पिल्यासारखे होते आणि वट्यांच्या लोकोत्तर गुणांमुळे भारताला गौरवसंपन्नता आली, म्हणून प्रत्येक भारतपुत्राच्या चित्तांत लोकमान्यांविषयी निरपवाद अत्यत आदरभाव वसत होता. त्या आदर- भावाला लोकप्रियतची जोड मिळणे वा न मिळणे हे त्या त्या व्यक्तीचा लोकमान्यांशी जशा प्रकारचा सबघ आला असेल त्या प्रकारावर अवलंबून असणार ह उघड आहे. याचा निष्कर्ष थोडक्यांत सूत्ररूपाने सांगावयाचा झाल्यास असे म्हणतां येईल की, * ग्रत्येक भारतीयाच्या मनांत लोकमान्यांविषयी आदरभाव आणि ज्यांची त्यांच्याशी निकट सबंध आला व्यांच्या मनांत प्रेमभाव वसत असे. * तात्यासाहेब केळकरांच्याविषयीा जनतेला काय वाटत असे याचें एथक्करण केल्यास त्याचा 'क्षेष्कषाहे सूत्ररूपाने असा मांडतां येईल की, * प्रत्येक भारतीयाच्या मनांत तात्या- साहबांविषयी प्रेमभाव आणि ज्यांना त्यांच्या मताचा थोरपणा पटला त्यांच्या मनांत त्यांच्याविषयी आदरभाव वसत असे. * स्पष्ठीकरणार्थ एक-दोन दृष्टान्त वरील परिच्छांदतील भेद आणखी एका टृष्टान्तान अधिक स्पष्ट करूं वराहावतार धारण करून श्रीविष्णूने बुडालेल्या ए्थ्वीला वर काढल. त्याबरोबर पृथ्वीवरील सवं पग्राणिमात्रांचाह उद्धार झाला. लो. टिळकांनी पारतच्याच्या डोहांत बुडालेल्या भारतखंडाचा उद्धार केला; त्याबरोबर प्रत्येक भारतवासीयाला मोठेपणा प्राप्त झालाच; पण हा फायदा सामुदायिक असल्याने कोणी विशिष्ट व्यक्ति माझा लोकमान्यानी उद्धार केला म्हणून लोकमान्यांविषयी वैयक्तिक कृत ज्ञता दर्शविण्यादैिषयी तळमळीनें पुढ येणार नाही. परतु एखाद्या पाणबुड्याने बुडणारी शेपन्नास माणसे पाण्यांतून वर काहून वाचविली असतील, तर ती सवं माणसे जन्मभर त्याचे गुण कृतज्ञतेने आठवीत राहातील. लॉ. टिळकांची काम- गिरी वराहावतारासारखी राष्ट्रोद्धार करणारी असून, तात्यासाहेबांची कामगिरी पाणबड्याने अनेकाचे प्राण वाचविण्यासारखी होती. वरील पोराणिक दष्टान्ताएवजी चालू व्यवहारांतला दृष्टान्त अनेकांना अधिक




User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now