मराठी रियासत ६ | Maraathii Riyaasat 6

55/10 Ratings. 1 Review(s) Add Your Review
Maraathii Riyaasat 6 by गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

More Information About Author :

No Information available about गो. स. सरदेसाई - Go. S. Sardesaai

Add Infomation About. . Go. S. Sardesaai

Sample Text From Book (Machine Translated)

(Click to expand)
लिक श्‌ सिन तीन पिढ्ष्यांचा कछ्लोळ [ १७५०-१७६१ ] १. रामराजाचे पूर्ववृत्त २. राज्यारोहण ३. रामराजाची कुचंबणा ४. सांगोल्याची मोहीम ५. रामराजास अटक ६. आहेसाहेबाांचा वसवास ७, समेट ८. कोल्हापुरकर संभाजीची अखेर ९, प्रतिनिधि व बाबूजी नाईक. ताराबाई, झाहू व रामराजा या तीन पिढ्यांच्या दरम्यान छत्रपतींच्या कुटुंबांत कलहकल्लोळाची अवदश्ा बोकाळली तिचें वृत्त हा अध्याय सांगणार आहे. १. रामराजाचे पूर्ववृत्त -- ताराबाईनें या आपल्या नातवाला आपल्या नवऱ्याचे राजाराम हें नांव दिले. परंतु नवऱ्याचे नांवाचा उच्चार करावयाचा नसल्यामुळें, त्यांत थोडा फरक करून ती त्यास रामराजा असें म्हणूं लागली. रामरा[जाची आरंभींची हकीकत ठिकठिकाणीं दिलेली आढळते. रामराजा गादीवर आल्यावर त्याने ता. १ मार्च स. १७५० रोजीं भगवंतरावास अमात्यपदाची सनद करून दिली, तींत व ताराबाईच्या कित्येक पत्रांत त्याची हकीकत दिलेली आढळते, तीच भरंवसेलायक मानली पाहिजे. अमात्यांच्या बखरींतही कांहीं तपश्लील आहे.$ या सर्वांचा इत्यर्थ असा. शाहू महाराजांस समाधान वाटेनासें झालें. त्याकाळीं राज्यास अधिकारी कोणी नाहीं. यास्तव संभाजी महाराजांस बोलावणे पाठविलें असतां आले नाहींत, म्हणोन पांचचार मुलें आणून दत्तक घेण्याचा बेत होऊन मुधोजी भोसले नागपुरकर, राणी सगुणाताईच्या बहिणीचा मुलगा, यास दत्तक घेणेचा निश्चय चिटणीस यांचे विचारें ठरला. तेव्हां मातोश्री ताराबाई यांनीं समाचारास येऊन $ भगवंतरावाची सनद ६ स. पे. द. पृष्ठ २२. ताराबाई पत्रें रा. खं. <; अमात्यबखर भा. व. १
User Reviews

No Reviews | Add Yours...

Only Logged in Users Can Post Reviews, Login Now